दौंड तालुक्यातील खडकी येथून सराईत गुन्हेगाराकडून २ तलवारी जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील खडकी येथे एका सराईत गुन्हेगाराकडून २ तलवारी जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दिनांक ११ जुन २०२१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत फरारी आरोपीचा शोध घेत असताना पथकास खडकी ता.दौंड जि.पुणे येथे पुणे-सोलापूर लगत संकेत स्वीट समोर एक इसम दोन तलवारी घेवून उभा आहे. अशी बातमी मिळताच पथकाने खडकी येथे पुणे-सोलापूर लगत संकेत स्वीट समोर जावून पाहिले असता तेथे संशयास्पदरित्या मिळून आलेला इसम नामे दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे वय २० वर्षे रा.मलठण, चिलोबा वस्ती, ता.दौंड जि.पुणे यास ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याचेकडे बेकायदा विनापरवाना बाळगलेल्या २ तलवारी व १ मोबाइल असा एकुण किं.रु. १४,०००/- चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपीविरुद्ध दौंड पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
जप्त मुद्देमाल व आरोपी यास दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेला आहे. आरोपीने सदर तलवारी कशासाठी आणल्या आहेत? याबाबतचा अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड) येथे पिस्तोल बाळगले बाबत आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकशिंगे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!