पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त दौंड तालुक्यातील युवकांचा युवासेनेत प्रवेश !

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दौंड तालुक्यातील अनेक युवकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत युवासेनेचे निलेश मेमाणे, समिर भोईटे व युवासेना दौंड च्या वतीने बोरमलनाथ गोशाळा, बोरीपार्धी येथे जनावरांसाठी चारा वाटप व मंदिर परिसरात चिंच, कडू लिंब, शिसम, रेन ट्री आशा अनेक वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी युवासेनेचे निलेश मेमाणे, समिर भोईटे, शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, नवनाथ जगताप,दौंड शहर प्रमुख आनंद पळसे ,विभाग प्रमुख हनुमंत निगडे, शिवाजी साळुंके, उप विभाग प्रमुख निरंजन ढमाले, पडवी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शितोळे, दत्तात्रय चव्हाण ,अमित बारवकर व शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप, शंकर शितोळे, संदिप कडू, शुभम माळवे, गणेश शिंदे, शुभम गुळुंजकर, अमित पवार व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!