अ‍ॅड. अझरुद्दीन मुलाणी यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील मळद गावचे अ‍ॅड. अझरुद्दीन बाबा मुलाणी यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पुणे जिल्हा ( ग्रामीण)उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने युवा वर्गाला प्रोत्साहनच मिळाले आहे. वकिली व्यवसाय करत असताना आमदार राहुल कूल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अ‍ॅड. अझरुद्दीन मुलानी यांनी राहुल कूल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले
भाजपा अल्पसंख्याक मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष राजुभाई शेख यांनी अ‍ॅड.अझरुद्दीन मुलाणी यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल यांनी अझरुद्दीन मुलाणी यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी मुलाणी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!