तलाठ्याला वरिष्ठांचा आदेश नसताना बोगस नोंद..

प्रतिनिधी :- आलिम सय्यद , दौंड-पुणे

:- दौंड तालुक्यातील पाटस गावचे तलाठी शंकर दिवेकर यांनी शासकीय कामकाजात हलगर्जीपणा करत शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन केला असल्याचा ठपका तहसीलदार संजय पाटील यांनी ठेवला असून योग्य त्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे.
पाटस येथील राहुल ढमाले यांनी तलाठी शंकर दिवेकर यांच्या विरोधात गट क्र. ३८७/अ/१ मधील सतरा वर्षांपासून इतर हक्कात असलेली नोंद करताना तहसीलदार व प्रांत अधिकारी यांचा आदेश नसताना बोगस नोंद केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने तलाठी यांची दप्तर तपासणी केली असता अनेक बाबींमध्ये तृटी आढळून आल्या असून संबंधित तलाठी वर कारवाई करून संबंधित तक्रारदार यांना संबंधित विभाग न्याय देणार का हे पाहणे निश्चित ठरतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!