दलित पँथरच्या 49 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुका डहाणू येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन..

डहाणू प्रतिनिधी
शिवप्रसाद कांबळे

शुक्रवार दिनांक 9 जुलै 2019 रोजी दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने संघटनेचे 49 व्या वर्धापन दिनानिमित्त डहाणू तालुक्यातील वाणगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला मौजे कापसी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरास पँथरचे ज्येष्ठ नेते प्रशांत नांदगावकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व तज्ञ डॉक्टर स्वाती मोरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या , मोफत औषधांचे वाटप व covid-19 किटचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन दलित पँथर डहाणू तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते . यावेळी पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत , पालघर जिल्हा अध्यक्ष जगदीश राऊत, पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष बिंबेश जाधव ,पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अरशद खान, जिल्हा कोषाध्यक्ष भरत महाले , जिल्हा महासचिव व प्रसिद्धी प्रमुख संतोष कांबळे ,पालघर जिल्हा उपाध्यक्ष लहानु डोबा, चेतन जाधव,भावेश दिवेकर ,रोहित चौधरी, पालघर जिल्हा सचिव व सहप्रसिद्धी प्रमुख शिवप्रसाद कांबळे ,पालघर जिल्हा सहसचिव रमाकांत गायकवाड ,जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख निलेश गायकवाड , प्रमुख दिवाकर जाधव ,पालघर जिल्हा महिला अध्यक्ष मोहिनी जाधव , पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष विद्या मोरे ,भारती राऊत, जिल्हा उपकार्याध्यक्ष मरिना रिबेलो, पालघर तालुकाध्यक्ष किशोर राऊत, डहाणू तालुकाध्यक्ष व तलासरी डहाणू तालुका संपर्क प्रमुख विनायक जाधव, जव्हार मोखाडा सहसंपर्क प्रमुख इरफान शेख व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिरास पंचक्रोशीतील असंख्य लोकांनी उपस्थित राहून महाआरोग्य शिबिराचे लाभ घेतले व कार्यक्रम यशस्वी केले. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी आभार मानले. व आपला देश आपली जबाबदारी समजून अश्या संकटसमयी अनेक समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील विविध तालुक्यात संघटनेच्या वतीने करण्यात यावे असे आदेश उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!