
शेवगांव कॉंग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष पदी निजाम पटेल यांची नियुक्ती
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
दि. १० जुलै रोजी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, आ. डॉ. सुधीर तांबे व आ. लहुजी कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अनुराधाताई नागवडे, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांच्या उपस्थित सार्वजनिक विश्रामगृह अहमदनगर येथे शेवगांव काँग्रेसची संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी शेवगांव कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ना. थोरात साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पदावर निवड करण्यात आली.
कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व खा.राहूल गांधी यांचे शेवगाव तालुक्यात हात बळकट करण्यासाठी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवक अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य युवकांच्या हक्काचे व्यासपिठ तयार करण्यासाठी शेवगाव तालुका कॉंग्रेस मार्फत कॉंग्रेस पक्षाचे ध्येय धोरण राबवण्यासाठी शेवगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या शिफारशीनुसार खरा महाराष्ट्र या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक निजाम बंडूभाई पटेल यांची शेवगाव तालुका कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदी, युवक काँग्रेसच्या शेवगांव शहर अध्यक्षपदी गणेश क्षीरसागर, तर शेवगांव तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी सचिन काळे यांची नामदार थोरात साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी शेवगांव शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कापरे, उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, युवक अध्यक्ष बब्रु वडघने यांच्यासह तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.