राजू साळी यांनी कुंचल्याद्वारे साकारले विठ्ठलाचे चरण दर्शन..

राजु तडवी फैजपुर
चित्रकार हा धेय्य वेडा असतो. काही ना काही नवीन करण्याचा ध्यास मनात असून त्या दिशेने मार्गक्रमण करत असतो.नवीन संकल्पनाच्या जोरावर कलानिर्मिती करून समाजापुढे मांडतो.असेच श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेव,येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीचे औचित्य साधून कल्पतेने कुंचल्याद्वारे आगळीवेगळी पैंटिंग तयार करण्यात आली.पैंटिंग बघितल्यावर विठ्ठल विटेवर उभा असून फक्त चरण दाखवण्यात आले. पिवळ्या रंगाचा चंदनाचा टिळा आणि टाळकरी दिसत आहेत.सदर पैंटिंग बघितल्यावर मनप्रसन्न होते.पैंटिंग करण्याचा एकच उद्देश भारताला कोरोना महामारीतून मुक्त कर,व सर्वदूर चांगला पाऊस पडू दे,बळीराजाला सुखी ठेव.आजपर्यंत साळी यांनी बऱ्याच सामाजिक विषयावर पैंटिंग करून जनजागृती केलेली आहे.त्यांच्या विठलाच्या पैंटिंगचे सर्वदूर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!