दौंड तालुक्यात दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा प्लॅन पोलिसांनी केला चौपट…

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी गावच्या हद्दीत (१ ऑगस्ट रोजी रात्री १०) च्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी जेरबंद केलंय या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर चार आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले असल्याचं पोलिसांनी सांगितले.
खडकी गावाच्या हद्दीत ( शितोळे वस्ती नं. १) असणाऱ्या पुलाजवळ काही अज्ञात इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाल्याने पवार यांनी क्षणाचा विलंब न होता. आपल्या कर्मचाऱ्यांना घेत घटनास्थळी धाव घेतली . दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींवर झडप टाकीत तिघांना जेरबंद केले , त्यांच्यासोबत असलेले इतर चौघे अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले आहेत . आरोपींकडून तीन दुचाक्या , तीन सत्तुर , एक गुप्ती , एक मिरची पुड पाकीट , ग्रिफ वायर , पक्कड असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे . पोलीस निरीक्षक नारायण पवार , सहाय्यक फौजदार भगत , पो . हवालदार पांडुरंग थोरात , गोरख मलगुंडे , भोसले , पो . नाईक गवळी , पो . कॉ . हिरवे , हंडाळ , देवकाते तसेच स्थानिक पोलीस मित्र ज्ञानेश्वर शितोळे , असिफ शेख , ज्ञानेश्वर शितोळे या पथकाने सदरची कारवाई बजावली . पुढील तपास पोलिस . उपनिरीक्षक प्रकाश खरात करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!