रोटरी क्लबच्या माध्यमातून केले वृक्षारोपण..

दौंड- पुणे :- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी व वेक्स प्रा.ली यांच्या संयुक्त विद्यमाने कुरकुंभ एमआयडीसी मध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र ( सीईटीपी ) प्रकल्पात २०० झाडे लावण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, जांभूळ, असे अनेक प्रजातीची वृक्ष यावेळी लावण्यात आली. यामध्ये रोटरी क्लब ही अनेक वर्षांपासून या औद्योगिक वसाहत तसेच परिसरात अनेक प्रकारची वृक्ष रोपण केली असून या पुढेही अनेक प्रकारची वृक्ष लावणार आहे. असे रोटरी क्लब चे अध्यक्ष मनीष अग्रवाल यांनी सांगितले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी चे अध्यक्ष मनीष अग्रवाल, दौंड रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रमोद खागल, विश्वा लॅब चे संचालक विष्णू होलनार, विनामँक्स चे संचालक विकास टोपले, सुनील ठोंबरे, शशिकांत भारती, उत्तम कुलकर्णी, अरुण कलगुड, शहाजी पवार, मितेश भाई अलोंद्रा, राहुल गवारे, नरसिंग थोरात, तसेच सीईटीपी चे कर्मचारी या वेळी उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!