वसई-विरार महानगरपालिकेने मालमत्ता करात वाढीव उपभोक्ता कर आकारल्याने दलित पॅंथर आक्रमक..

डहाणू प्रतिनिधी
शिव प्रसाद कांबळे

वसई-विरार महानगरपालिकेने मालमत्ता करात वाढीव उपभोक्ता कर आकारल्याने दलित पॅंथर आक्रमक

दलित पॅंथरचे वसई तालुकाध्यक्ष हरेश मोहिते यांनी दिला आंदोलनाचा इशारा

दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी दलित पँथर वसई तालुका अध्यक्ष हरेश मोहिते यांनी वसई विरार महानगर पालिका उपायुक्त प्रदीप जावळे पाटील यांची प्रत्यक्ष भेटून घेऊन मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात उपभोक्ता कर वाढवून सर्वसामान्य जनतेवर केलेल्या अप्रत्यक्ष अन्याया विरोधात दलित पँथर वसई तालुका अध्यक्ष हरेश ग. मोहिते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महानगर पालिकेच्या सर्वत्र प्राप्त झालेल्या मालमत्ता कर बिलात उपभोक्ता कर ६०० रुपये नमूद करण्यात आलेले आहे. सदरचे उपभोक्ता कर कशासाठी लावण्यात आलेले आहे याचा सर्व सामान्य नागरिकांना बोध होत नाही. देशात कोविड-१९ विषाणूच्या प्रदुर्भावाने अगोदरच लॉक डाऊन मुळे अनेक कामधंदे बंद , त्यात बेरोजगारी , प्रचंड वाढलेली महागाई अश्या परिस्थितीमध्ये अचानक वाढलेल्या मालमत्ता कर जनसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे.
मुळात नगरसेवकांची बॉडी बरखास्त असताना कोणत्या सभेपुढे सदरचे कर प्रस्ताव मंजूर केले अथवा सदरचे कर महाराष्ट्र राज्य शासन पुढे प्रस्ताव ठेऊन मंजूर केले असल्यास व कसे याचा जाहीर खुलासा करावा . तसेच सदर मालमत्ता कर हा जनतेवर लादलेला मोगलाई कर असून, तात्काळ रद्द करावा अन्यथा दलित पँथरच्या वतीने बेमुदत धारणा आंदोलन करण्यात येईल व आंदोलना दरम्यान होणाऱ्या विपरीत परिणामास आपली जबाबदारी राहील असा इशारा पँथरचे वसई तालुका अध्यक्ष हरेश मोहिते यांनी दिला. या वेळी पँथरचे नालासोपारा शहर अध्यक्ष मोहम्मद फैयाज शेख व कार्यकर्ते उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!