परवानगी नसतांना बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने आमदार चंद्रकांत पाटील..

Read Time:3 Minute, 24 Second

अवैध विक्री करणाऱ्या वर कारवाई ला दिरंगाई का?
रावेर तहसीलदार यांची भूमिका संशयास्पद
प्रांताधिकारी यांच्या कडे व्यक्त केली नाराजी
—————————————-
राजु तडवी फैजपुर

सावदा हद्दीतील असलेल्या बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती मात्र बायोडिझेल कोणताही प्रकारचा परवाना नसतानाही ही विक्री कशी सुरू होती या प्रकरणी रावेर तहसीलदार याच्या कार्यपद्धतीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली
फैजपूर प्रांताधिकारी कैलाश कडलग यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली यात कोणी अधिकारी दोषी असेल त्यांची मी स्वतः तक्रार करणार आहे त्यामुळे बायोडिझेल विक्रीसाठी कोठून उपलब्ध होते याबाबत महसूल अधिकारी यांनी याचा तपास केला का? तसेच पोलिस प्रशासन यांना कारवाई साठी पत्र अथवा गुन्हा का दाखल केला नाही त्यामुळे रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली
बुधवारी एक वाजता प्रांताधिकारी कार्यलायत आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग यांची भेट घेतली व बायोडिझेल विक्रीची कोणतीही परवानगी नसताना सावदा विभागात बिनधास्तपणे बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे यात मागील एका आठवड्यात फक्त सावदा हद्दीतील बायोडिझेल पंपावर सील केले ही कारवाई रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी कारवाई केली मात्र त्या पंपावर कारवाई केली मात्र कोणतीही पोलिसात फिर्याद दिली नाही किंवा बायोडिझेल पंपचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी का पाठवले नाही त्यामुळे महसूल अधिकारी यांच्या कार्यप्रणाली वर शंका उपस्थित होत आहे यात काही आर्थिक चिरी मिरी तर नाही असा थेट सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दोषी वर कारवाई करण्यात येईल असे सांगितले व वस्तूनिष्ठ अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्याचे सांगितले
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक अमोल निंबाळे,शेख शाकिर शेख इमाम,शिवसेना उपतालुका प्रमुख राजू काठोके यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!