ग्रामीण भागातील तरुणाईला वेब सिरीज निर्मिती चे वेध..

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी : विनायक साबळे) :साँस बहू या ड्राम्यानं बराच काळ छोट्या पडदा गाजवला… मात्र आता काळ बदललाय आणि टीव्हीशिवाय इतर माध्यमंही अधिक प्रभावी होऊ लागलीत.. टीव्हीपेक्षा इंटरनेट अधिक आकर्षित करु लागलंय.. खास करुन तरुणाईकडून इंटरनेटचा वापर अधिक होऊ लागलाय.. त्यामुळं इंटरनेटवर वेब सिरीज नावाचा प्रकार तरुणाईला आकर्षित करु लागलाय.. छोट्या पडद्यावरील मालिकांप्रमाणे अधिक रंजक कथा, नवे चेहरे, काळजाला भिडणारे विषय, मनोरंजनाचा मसाला यामुळं या वेब सिरीज तरुणाईमध्ये सुपरडुपर हिट ठरतायत.. नव्या मालिकांप्रमाणे छोट्या पडद्यावर गाजलेल्या काही मालिकाही वेब सिरीजच्या माध्यमातून नेटिझन्सना आकर्षित करतायत..

अशीच एक “गजाय गचकीन” नावाची नेटिझन्सना आकर्षित करणारी वेब सिरीज हवेली तालुक्यातील काही तरुणांनी एकत्रित येत निर्मित केली.. सामाजिक संदेश आणि कॉमेडी चा एकत्रित मिलाप साधत भावडी येथील तरुण सोमनाथ तांबे या तरुणाने या वेब सिरीज च लिखाण करून दिग्दर्शन केलं.. राहुल शिवले आणि किरण पाचपुते या दोन युवकांनी निर्मित केलेल्या या वेब सिरीज मध्ये माणिक काळे,सोमनाथ तांबे, भिमाजी कदम, आण्णा राजे शिवले,लक्ष्मण लोखंडे,वैभव सुपेकर,आश्विन तांबे,मानसी माने,आयुब शेख,यांसह अनेक नवनवीन कलाकारांना संधी देत ग्रामीण भागातील कलाकार उदयास आणण्याचं काम केलं..
1990 च्या दशकात छोट्या पडद्यावर पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री या फोटो पत्रकाराची एंट्री झाली.. तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस.. मात्र ज्यानं मनःशांती आणि ध्यानधारणा करुन सुपरपॉवर मिळवली आणि तो बनला शक्तीमान… शत्रूंचा विनाश करणारा हा शक्तीमान आता छोट्या पडद्यासोबतच इंटरनेटवर वेब सिरीजच्या माध्यमातूनही सुपरहिट ठरतोय.. मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तीमान आणि त्याच्या पराक्रमाच्या सुरस कथा वेब सिरीज मार्फत नेटिझन्सचं मनोरंजन करतायत. 1990 च्या दशकात शक्तिमान सुपरहिरो ठरला त्याच पद्धतीने 2021 च्या दशकात गजाय गचकीन नेटिझन्स च्या मनात धुमाकूळ घालणार यात तिळमात्र शंका नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!