
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेल च्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी संजय दत्तू पवार यांची नियुक्ती…
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेल च्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी संजय दत्तू पवार यांची नियुक्ती. दौंड येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालय येथे माजी आमदार पुणे जिल्हा सहकारी बँक चेअरमन रमेश थोरात तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष अफसर खान जिल्हा युवक अध्यक्ष संदिपान वाघमोडे तालुका अध्यक्ष तात्यासाहेब टेळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यावेळी पवार यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार , मंत्री , जयंत पाटील ,उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ ,खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह पक्ष मजबुतीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी दखल घेत पवार यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका उपाअध्यक्ष पदी यांची निवड केली असल्याचे विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी सांगितले.
तसेच पक्षाचा अधिक विस्तार करून अनेक पदाधिकारी पक्षाशी जोडावे यासाठी आपली निवड झाली असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष राठोड यांच्या हस्ते देऊन पवार यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड म्हणाले की,भटक्या विमुक्त समाजातील लोकांना सांगतो की, तुम्ही राजकारणी बना, राजकारणात या आम्ही तुम्हाला सन्मानाचं पद देऊ. या समाजातील कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीचे आणि भटक्या विमुक्त समाजातील विकासाचे काम चांगले केले तर स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येण्यासाठी पक्षाच्यावतीने उमेदवाराची संधी देऊ. पक्षाचे काम करणे एवढेच मर्यादित न ठेवता या समाजातील लोक सत्तेमध्ये ही गेली पाहिजे ते धोरण ठेवून महाराष्ट्रामध्ये ३५३ तालुक्यांपैकी ३२२ तालुक्यामध्ये ही कार्यकारिणी तयार केली. ३६ जिल्हे २२; शहर प्रदेश कार्यकारणी केली आहे. या विभागातील सर्व जाती-धर्माची लोकांना एकत्र करून या सेलची मोट बांधली आहे. दौंड तालुक्यात आणि शहरात भटक्या-विमुक्तांची मोठी संख्या आहे .राज्यात जर विचार केला तर तीन ते साडेतीन कोटी ची लोकसंख्या भटक्या-विमुक्तांची आहे. आपण या भटक्या-विमुक्तांना सोबत घेतले नाही. म्हणून ५६ आमदाराच्या पुढे आमदार निवडून येत नाहीत. तेव्हा शरद पवार यांनी जेवढे सेल फ्रंटलर आहेत .त्यापैकी बारा बलुतेदार समाज एकत्र गोळा करून त्यांना पक्षांमध्ये घेऊन सन्मानाचे पद देऊन आता पुढची निवडणूक २०२४ साठी परिवर्तनाचे दिवस चालू केले आहेत .भटक्या विमुक्ता बद्दलच्या समस्या साठी ३२ वर्षांपासून मी सरकारकडे लढत आलो आहे. भटक्या-विमुक्तांची पाल, घरे. वाडी- वस्ती असेल, गायरान जागा असेल ती त्यांच्या नावावर करा .त्यांना घर बांधून द्या .अशा बाबतीतील शरद पवार यांच्या बरोबर याबाबत पक्षांमध्ये भूमिका मांडून आपण गोरगरिबांना न्याय मिळवू शकतो. पक्ष भटक्या-विमुक्तांच्या बाबत सकारात्मक चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन प्रश्न सोडवत आहेत. मंग आपण का कमी पडलो पाहिजे हा उद्देश घेऊन राज्यभर फिरतो आहे असे राठोड यांनी सांगितले.