भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक एसीबीच्या जाळ्यात…

पाच हजाराची लाच घेतांना केली रंगेहात अटक

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी(विनायक साबळे) – जमीनीच्या मोजणीसाठी पाच हजार रुपयाची लाच घेणाऱ्या शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
पुणे अ‍ॅन्टी करप्शन पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.30) करण्यात आली. प्रशांत मोहन कांबळे असे रंगेहात पकडण्यात आलेल्या भूकरमापकाचे नाव आहे.
याप्रकरणी 53 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या जमिनीच्या मोजणीकरीता अर्ज केला होता. जमीनीची मोजणी करण्यासाठी भूकरमापक प्रशांत कांबळे याने पाच हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन पथकाकडे तक्रार दिली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पंचासमक्ष एसीबीने पडताळणी केली.
सोमवारी सापळा रचून प्रशांत कांबळे याला तक्रारदार यांच्याकडून 5000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले.
प्रशांत कांबळे याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!