शेवगाव जवळील नंदिनी नदीला पूर शेवगाव प्रशासन तात्काळ मदतीला हजर…

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

दि.31/08/2021 रोजी सकाळी 08/00वा. चे सुमारास शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरुर, भगूर ,वडुले बु.,जोहरापुर या नदी काठावरील गावांमध्ये पाण्यामुळे संपर्क तुटला त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून मदत कार्य सुरू केले. गावातील नागरिकांना तसेच तसेच पाण्यात अडकलेल्या जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
गेवराई ते शेवगाव रोडवरील ठाकुर पिंपळगाव चे पुलावरून एक ट्रक पाण्यात वाहून गेल्याने तो ड्रायव्हर नामे व्ही. गोविंद स्वामी रा. तामिळनाडू हे पाण्यामध्ये अडकून पडले होते त्यास ट्यूब व डोराच्या साह्यायाने सुखरूप पाण्यातून बाहेर काढले.वरुर येथील 20 लोकांना,लांडे वस्ती येथील 17 लोकांना व भगुर वस्तीवरील 35 लोकांना पाण्यात अडकल्याने त्यांना बोटीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढून सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे व
सध्य परिस्थिती नदीचे पाणी कमी झाल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात आली असून सदर कामगिरी साठी डी वाय एस पी सुदर्शन मुंढे ,प्रांत अधिकारी केकान ,तहसीलदार अर्चना पागीरे शेवगाव , सपोनि ठाकरे , सपोनि पावरा ,पोउनि गोरे , गोपनीय शाखेचे किशोर धाकतोडे व पोलीस स्टेशनचा स्टाफ हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!