गटविकास अधिकारी यांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक.

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

शेवगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे निर्माण झालेल्या परीस्थीतीची गंभीर दखल घेवुन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री महेश डोके यांनी दौरा करून सर्व भयभीत नागरीकांना दिलासा देवुन शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले
शेवगाव तालुक्यात ढगफुटी झाल्याने अनेक गावात परिस्थिती पुरजन्य झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.त्यातच शासकीय अधिकारी यांनी राहत व बचाव कार्य करण्यासाठी सरसावले त्यातच भगूर येथील नागरिक पूरपरिस्थिती मुळे अडकलेले असतांना शेवगाव तालुक्यातील दबंग गटविकास अधिकारी महेश डोके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुरात अडकलेले भगूर येथील म्हस्के वस्ती येथील पंधरा महिला लहान मुले व नागरिकांची सुटका केली. गटविकास अधिकारी यांनी दाखवलेल्या सामाजीक कर्तुत्वाचे कौतुक होत आहे.
शेवगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी जन्य परीस्थीतीचा फटका अनेक दिव्यांग बांधवांनाही झालेला आहे नुकसान झालेल्या दिव्यांग बांधवांनी शेवगाव तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क करून शासनास झालेल्या नुकसानीची लेखी माहीती कळवावी जेणेकरून शासनास त्यांना मदत करता येईल
चांद शेख
सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था,संघटना

शेवगाव तालुक्यात झालेल्या अतीवृष्ठीची दखल घेवुन लोकप्रतीनीधी, तहसीलदार,पोलीस प्रशासन,
गटविकास अधिकारी व सर्व अधिकारी यांनी दाखवलेली तत्परता अतिशय प्रशंसनीय असुन अनेक नागरीकांचे आशिर्वाद त्यांना मिळालेले आहेत.
बाबासाहेब महापुरे,सावली दिव्यांग संघटना अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!