“शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्थांना सढळ हाताने मदत करा”_ इन्सानियत फाऊंडेशन शेवगाव.

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
*इन्सानियत फाऊंडेशन* ही सामाजिक संघटना नेहमी सामाजिक मदत कार्यात अग्रेसर आहे. मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील नदिकाठच्या गावांना पूराचा जबरदस्त तडाखा बसला आहे,क्षणार्धात होत्याचे नाही झाले.जनावरे दगावली, घरात पाणी शिरल्याने गृह पयोगी वस्तु खराब झाल्या,अन्न धान्य, किराना सामान, कपडे इ.सर्व वाहून गेले आणि काही खराब झाले.
अशा परिस्थितित माणुसकीच्या नात्याने *इन्सानियत फाऊंडेशन शेवगाव* ही सामाजिक संघटना आपणास पुन्हा एकदा मदतीचे अवाहन करीत आहे, ज्या प्रमाणे आपण कोकण, सांगली, कोल्हापुर या भागातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिलेला आहे,तशा मदतीची आज आपल्याच घरातील लोकांना गरज आहे, या प्रसंगी *इन्सानियत फाऊंडेशन* आपणास पुन्हा एकदा मदतीचे आवाहन करीत आहे.
आपण आपली मदत रोख स्वरूपात,अथवा किराना सामान,
कपडे, ब्लांकेट, खराटे, फिनेल, बिस्कीट,खारी, फरसान, चिवड़ा,आटा व इतर अनेक वस्तु स्वरुपात करू शकता.
मदतीची इच्छा असलेल्यांनी संपर्क करावे.

*मोबाइल नं.9689669787.*

*अध्यक्ष, सचीव,खजिनदार व सर्व*
*सदस्य तसेच सर्व कार्यकर्ते,*
मदत पोहचं करण्यासाठी संपर्क करा
*इन्सानियत फाऊंडेशन शेवगाव.*
ईदगाह मैदान ,मिरी रोड, शेवगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!