वृक्षतोड करणार्‍यावर कारवाई करा;वृक्षप्रेमी चंद्रकांत वारघडे यांची मागणी, दिला आंदोलनाचा इशारा…

दिला आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी : कोरेगाव भीमा (विनायक साबळे)
वाघोली ता. हवेली येथील चोखीदाणी रोड लगत असलेल्या झाडांची अज्ञात व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील एका अनाधिकृत होल्डिंग वाल्याकडून या झाडाची तोडणी केल्याचे बोलले जात आहे.यातील काही झाडे पूर्णपणे तोडली आहेत तर काहींच्या फांद्या छाटल्या आहेत. वाघोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा होल्डिंग व फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यावर तर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. परंतु याच अनाधिकृत होल्डिंग व फ्लेक्स वाल्याकडून फ्लेक्स होल्डिंग साठीअडथळा ठरणारी झाडे, झाडाच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. याबाबत वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी नाराजी व्यक्त करत वन विभागाकडे तक्रार देखील केले आहे. तर नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोली मध्ये पुणे महानगरपालिकेकडे अनाधिकृत होल्डिंग व फ्लेक्स साठी असलेल्या “आकाश चिन्ह” या विभागाने वाघोली परिसरातील अनाधिकृत होल्डिंग व फ्लेक्स यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा माहिती सेवा समितीच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल.असे चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!