
कुरकुंभ एम.आय.डि.सी. च्या अध्यक्षपदी मनीष अग्रवाल तर सचिव पदी सुनील ठोंबरे..
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम.आय.डि.सी. च्या अध्यक्षपदी मनीष अग्रवाल तर सचिव पदी सुनील ठोंबरे यांची निवड करण्यात आली.
शुक्रवार दि.३ सप्टेंबर रोजी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसी कार्यालय येथे रोटरी क्लब कुरकुंभ एमआयडीसी यांची बैठक घेण्यात आली यावेळी रोटरी चे प्रांतपाल पंकज शहा, सहायक प्रांतपाल प्रफुल भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून अग्रवाल यांची तर सचिव म्हणून ठोंबरे आणि इतर पदाधिका-यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी माजी अध्यक्ष फुलचंद ढोरे यांनी गतवर्षीच्या काळातील सामाजिक कामाचा लेखाजोखा मांडून नवीन अध्यक्ष आणि पदाधिका-यांना भविष्यातील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लब च्या माध्यमातून अनेक कामे केली असून चालू वर्षी नव-नविन कार्यक्रम राबवणार असून , यामध्ये रक्तदान शिबिर ,झाडे लावणे, आरोग्य शिबिर. व गरजू विद्यार्थांना शालेय वास्तुचे वाटप करणे, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत. असे अनेक कार्यक्रम घेणार असल्याचे नव्वर्चित अध्यक्ष अग्रवाल यांनी याप्रसंगी सांगितले,
यावेळी दौंड रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ.शालिनी पवार, डॉ.राजेश दाते यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम.आय.डि.सी चे पदाधिकारी , काही सदस्य उपस्थित होते. सदरची बैठक मर्यादित व्यक्तींसह कोरोना संसर्ग रोगाचे शासकीय नियम पाळून पार पडली.
आणखीन काही महत्त्वाचे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत एका तरुणाचा खून..
दौंड:-आलिम सय्यद दौंड तालुक्यातील पारगाव येथील निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ- बारामती महामार्गावरील जिरेगाव गावच्या हद्दीत एका...
आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
दौंड:- आलिम सय्यद, दौड तालुक्याच्या पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील...
राज्य शासनाकडून विश्वा लॅब कंपनीला उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार..
दौंड :- आलिम सय्यद पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील विश्वा लॅबोरेटरीज प्रा. लि. या औषध निर्मिती कंपनीला...
जव्हार मर्चंट नागरी सहकारी (पतसंस्था) .बँक निवडणुकीची मतदार सभासदांची यादी जाहीर…
जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजांनी स्थापन केलेली जव्हार अर्बन बँक . आज या बँकेला १०० वर्षे पूर्ण होऊन गेले...
पौष्टिक तृणधान्य आहारात गरजेचे – राहुल माने..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 निमित्त पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व...
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ कुरकुंभ येथे क्रिकेट चे स्पर्धाचे आयोजन..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ छत्रपती करंडक 2023 कुरकुंभ क्रिकेट चे स्पर्धा...