सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे प्रकरणाबाबत राज्यात दलित पँथर आक्रमक..

Read Time:3 Minute, 41 Second

पालघर प्रतिनिधी माधव तल्हा

ठाणे महानगर पालिका हद्दीतील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रचंड सुळसुळाट झाल्याने , ठाणे महानगरपालिकेने तातडीने कारवाईची भूमिका घेतली असता , महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे ह्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना व आपले कर्तव्य बजावत असताना अचानकपणे त्यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून धारदार शस्त्राने भ्याड हल्ला करण्यात आला होता. सदर जीवघेण्या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची हाताची दोन बोटे छाटली जाऊन त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व सदर प्रकरणाने पुन्हा एकदा राज्यात महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंध देशभरात सर्वत्र संताप व चीड व्यक्त केली जात आहे. सध्या कल्पिता पिंपळे यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून तुटलेल्या बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही. परंतु ठाण्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांकडून यापूर्वीही हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या असताना , महानगर पालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होत असताना महानगर पालिकेने पोलिसांची अतिरिक्त मदत घेतली होती का? तसे असल्यास हल्लाच्या वेळी उपस्थित पोलीस अधिकारी किंवा महानगर पालिकेचे सुरक्षा रक्षक व कर्मचारी संबंधित ठिकाणी काय करत होते? उपस्थित होते तर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. परिणामी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात करण्यात यावी व सदर निंदनीय प्रकरणाचा दलित पँथर महाराष्ट्राच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याबाबतचे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी साहेब पालघर द्वारा देण्यात आले. यावेळी दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत , पालघर जिल्हा अध्यक्ष जगदीश राऊत , पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष बिंबेश जाधव , पालघर जिल्हा महासचिव व जिल्हा प्रसिद्ध प्रमुख संतोष कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष लहानु डोबा , महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी जाधव , महिला जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई मोरे , पालघर तालुका उपाध्यक्ष शालिनी वानखेडे , दिनकर वानखेडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!