
विविध मागण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांची भेट व चर्चा..
पालघर प्रतिनिधी माधव तल्हा
दलित पँथर संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांबाबत तसेच गोरगरीब जनतेचे प्रश्न घेऊन वेळोवेळी आंदोलने , निवेदने ,धरणे निदर्शने करूनही जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे ,शेतकऱ्यांचे , कामगारांचे ,आदिवासी जनतेचे ,दलित वस्तीचे , जनतेच्या आरोग्याशी संबंधित व जिल्ह्याच्या विकासाशी निगडित असलेले अनेक महत्वाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील भ्रष्टाचार, बोईसर येथील कब्रस्तानाचा प्रश्न , जिल्हा नियोजन भवनातील आंबेडकर भवनाचा प्रश्न, मौजे पाम येथील बुद्धीविहाराच्या जमिनीचा प्रश्न , औद्योगिक परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न, सुरक्षा राक्षकांचा प्रश्न , चटई कामगारांचा प्रश्न ,जिल्हा आरोग्य केंद्राचा प्रश्न ,मौजे पथराळी येथील गावठाण प्रश्न , मौजे पाम येथील सर्व्हे नंबर 160 मधील शेतकऱ्यांचा प्रश्न , जिल्ह्यातील दलित वस्ती सुधार योजनेतील व ग्रामपंचायत 15 टक्के निधीतील भ्रष्टाचाराचा प्रश्न ,दहिसर तर्फे तारापूर भिमाई नगर येथील स्मशानभूमीचा प्रश्न ,सफाळे व वाणगाव येथील रस्त्यांचा प्रश्न , मौजे माहीम येथील पाणेरी नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न ,पालघर MIDC बिडको नंडोरे अल्याळी सुंदरम येथील रस्त्यांचा प्रश्न , डहाणू येथील अदानी इलेक्ट्रिसिटी येथील राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न , मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील आदिवासी जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न ,जव्हार मोखाडा तालुक्यातील विविध प्रश्न ,सातपाटी ग्रामस्थांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. करिता सदर महत्वाच्या विषयांवर त्वरित चर्चा व निर्णय होणे महत्त्वाचे असल्याने जिल्हाधिकारी साहेब पालघर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात येऊन जलदगतीने मागण्या मार्गस्थ लावण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना प्रत्येक्ष भेटून देण्यात आले. यावेळी दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत , पालघर जिल्हा अध्यक्ष जगदीश राऊत , पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष बिंबेश जाधव ,पालघर जिल्हा महासचिव व जिल्हा प्रसिद्ध प्रमुख संतोष कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष लहानु डोबा , महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी जाधव , महिला जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई मोरे , पालघर तालुका उपाध्यक्ष शालिनी वानखेडे , दिनकर वानखेडे व कार्यकर्ते उपस्थित होते.