
महीला सरपंचावर हल्ले कराल तर याद राखा गांव पुढाऱ्यांना इशारा-बाबासाहेब पावसे..
पुणे प्रतिनिधी
संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या मनामनात रुजलेली सरपंच सेवा संघ महाराष्ट्र भर कार्यरत आहे नुकताच पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर च्या महीला सरपंच सौ गौरी गायकवाड यांच्यावर गावातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून गावातील श्री काळभोर सह कार्यकर्त्यांनी महीला सरपंच यांना बेदम मारहाण केली आहे या वेळी काही कार्यकर्ते उपस्थित होते यानी सुद्धा यां प्रकाराकडे दुर्लक्ष केले याची पण चौकशी करावी हल्ला करणा-या वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी सुध्दा बरंच वेळ थांबून ठेवून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी प्रशासनाने कोणतं सहकार्य केले नाही तरी संबंधित गुन्हेगार हा एक राजकीय पक्षांचा कार्यकर्ता आहे यावर तत्काळ कारवाई करावी असे प्रकार जर घडत असतील तर गांवात महीला सुरक्षित कशा राहतील महाराष्ट्रात महीला सरपंच मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे असे जर प्रकार घडत असेल तर सरपंच सेवा संघ कधीही सहन करणार नाही सरपंच यांच्यावर होणारे हल्ले यावर स्वतंत्र्य कायदा करा याकडे शासनाने दखल घ्यावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन उभारू असा इशारा संस्थापक बाबासाहेब पावसे यांनी दिली आहे महीला सरपंचावर हल्ला करण अतिशय निंदनीय निषेधार्थ आहे तरी यांच्या तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सरपंच सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष भाऊ मरगळे सरचिटणीस बाबासाहेब पावसे संघटक रविंद्र पवार सौ भाग्यश्री नरवडे सौ प्रमिला एखंडे सौ लक्ष्मी चांदणे तसेच महाराष्ट्रातील सर्व सरपंच पदाधिकारी सरपंच महीला सरपंच यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे