दौंड तालुक्यात युवकांचा शिवसेनेकडे वाढता कल..!

दौंड प्रतिनिधी:- आलिम सय्यद

पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील युवक वर्गाचा शिवसेने कडे कल मोठ्या प्रमाणात दिसत आहे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी पक्ष वाढी साठी मोठे प्रयत्न सूरु असून दौंड तालुक्यातील अनेक युवकांना शिवसेना पक्षात शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश होत आहे. दौंड तालुक्यात असलेली बेरोजगारी, नोक-यांचा अभाव, शेतक-यांची बिकट अवस्था अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त असलेला तालुक्यातील युवक, तरूण, शेतकरी, महिला वर्ग शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीसरकार कडे अपेक्षेने पाहत आहेत

शिवसेना हि चार अक्षरे आपले जीवनमान प्रकाशमय करू शकतात या विश्वासाने दौंड तालुक्यांतील युवकांचा युवासेना ,शिवसेनेकडे कल वाढला आहे

दौंड विधानसभा मतदार संघातील गणेश मोहन मेमाणे, स्वप्निल धनाजी शेलार, अकिब नजिब नदाफ, अरबाज युसूफ शिकीलकर, तन्वीर अश्रफ काझी यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला या ठिकाणी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला

या वेळी शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, युवा सेना जिल्हा समन्वयक निलेश शिवाजीराव मेमाणे, युवासेना तालुका युवा अधिकारी समिर भोईटे, युवासेना तालुका समन्वयक,सिने अभिनेते सागरआप्पा शेलार इ.युवासेना व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!