
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद..
– दौंड डीबी पथकाची कामगिरी सातत्याने सुरूच
दौंड :- आलिम सय्यद,
मागील काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारल्या पासून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी अवैध धंदे वर चांगलाच लगाम लावला आहे,तसेच पोलीस ठाण्यात या पूर्वी चे गुन्ह्यात अभिलेखावर पाहिजे / फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी डी बी पथकाला विशेष मोहीम राबवून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची मोहिम राबवून डी बी पथकाने उल्लेखनिय कामगिरी करत आत्तापर्यंत अनेक पाहिजे / फरार असलेले आरोपी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना पाहिजे असलेल्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा चांगलीच वचक निर्माण झाली आहे. नुकतेच 2 दिवसांपूर्वी डी बी पथकाला मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या निलेश कदम व अनिकेत सोनवणे यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले होते .त्यातच भर टाकत जबरी चोरी सारख्या गुन्ह्यातील मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या अजून एक आरोपी नितीन पोपट केंगार याला पकडण्यात डी बी पथकाला यश आले आहे. सदरच्या आरोपीवर एकून पाच गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्ह्यात तो फरार होता.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी,पो. हवा सुभाष राऊत,पो नाईक अमोल गवळी,किरण राऊत, पो ना आदेश राऊत,पो कॉ अमोल देवकाते यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहेत
आणखीन काही महत्त्वाचे
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून ॲक्सिस बँकेचा ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ उपक्रमासाठी सन्मान
२२ जुलै २०२४: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेला ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ या देशव्यापी...
ॲक्सिस बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त महाराष्ट्रातील ७५० हून अधिक एमएसएमईचा सत्कार
नागपूर, २८ जून २०२४: गतिमान आणि यशस्वी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला महत्त्वपूर्ण मानवंदना म्हणून भारतातील खाजगी...
भाजप पक्षाचे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्या विरोधात जव्हार पोलीस स्टेशन येथे अर्जाद्वारे तक्रार दाखल..
जव्हार/प्रतिनिधी भाजप पक्षाचे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशन या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून पत्राद्वारे गुन्हा दाखल करण्याची...
ॲक्सिस बँकेकडून नागपुरातील जपानी गार्डन येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन
नागपूर, ०७ जून, २०२४: जागतिक पर्यावरण दिन, २४ निमित्त, भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नागपुरातील...