प्रधानमंत्री मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त मारुळ येथे भाजपतर्फे रेशन बॅग वितरण..

—————————————-
राजु तडवी फैजपुर

अखंड भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या “सेवा व समर्पण अभियान” अंतर्गत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा वतीने मारुळ तालुका यावल येथे भाजपाचे नेते व माजी पालकमंत्री आ.गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे,खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष शेख आरिफ शेख रशीद यांच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकान येथे मोफत धान्य वाटपाच्या वेळी मोफत रेशन बॅगचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष शेख आरिफ शेख रशीद, जिल्हा उपाध्यक्ष मुनाफ सैय्यद खालीक, सदस्य मोहम्मद सैय्यद खालीक यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!