कायदा मोडला तर गुन्हा दाखल होणार – सपोनि सिद्धेश्वर अखेगावकर

—————————————-
राजु तडवी फैजपुर

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रुट मार्च करण्यात आला. नवरात्रोत्सवात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने पोलिसांनी संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार संध्याकाळी पाच वाजता संचलनाला सुरुवात करण्यात आली. त्यात २ अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी, १९ होमगार्डसह पोलिसांच्या फौजफाट्याने शहरात पायी संचलन केले. दरम्यान, आखेगावकर यांनी नवरात्रोत्सव दरम्यान शासनाच्या अटी, शर्तींचे कोणत्याही प्रकारे कोणीही उल्लंघन करणार नाही, याबाबत समजावून सांगितले. नियमांचा भंग झाल्यास संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!