
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दौंड तालुक्यात पहिल्या आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे उद्घाटन..
दौंड :-आलिम सय्यद
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दौंड तालुक्यातील पहिल्या आरटीपीसीआर ( लॅब ) प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवार (ता.७) रोजी डॉक्टर डी.एस लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एस. कुलकर्णी, डॉक्टर पी. बंगाळे, डॉक्टर दिपक लड्डा व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित क्लीन सायन्स कंपनीचे व्यवस्थापक विठ्ठल थोरात यांनी केले.
दौंड तालुक्यातील रुग्णांनी आरटीपीसीआर चाचणीचे नमुना जमा करून पुणे येथील प्रयोगशाळेत सादर केल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी अहवाल मिळत होते. यामुळे अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत होते. दरम्यान, सीएसटीपीएल फाउंडेशनच्या वतीने क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक आरटीपीसीआर प्रयोगशाळेसाठी लागणारी उपकरणे, साहित्य सीआरएस फंडातून देण्यात आली असून पुढील काळात या प्रयोगशाळेला आर्थिक मदत केली जाणार आहे. यावेळी शासनाच्या निश्चित केलेल्या दराच्या अर्ध्या दरात चाचणी केली जाणार असून सहा तासात चाचणीचे अहवाल संबंधितांना प्राप्त होणार आहेत. यामुळे रुग्णांना माफक दरात आरटीपीसीआर चाचणी होणार असून त्वरित व योग्य उपचार होण्यास मदत होणार आहे. रुग्णांची व नातेवाईकांची आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालासाठी होणारी धावपळ बंद होणार आहे.यावेळी क्लीन सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक कृष्णकुमार बुब, इटर्निस कंपनीचे व्यवस्थापक विजय खाडे, जे. पी.कंपनीचे व्यवस्थापक तसेच कुरकुंभ गावचे विद्यमान उपसरपंच विनोद शितोळे, तालुका आरोग्य अधिकारी अशोक रासगे, असिफ सय्यद,अमीर बागवान, आदी मान्यवर यावेळी उपस्तिथ होते