
दौंड पोलीस स्टेशन च्या हद्दीत सेक्स रॅकेट चा पुणे ग्रामीण पोलीस पथकाने केला पर्दाफाश..
दौड :-आलिम सय्यद
दौंड पोलीस स्टेशन च्या हद्दीत खडकी येथील चालणाऱ्या सेक्स रॅकेट चा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला पर्दाफाश ,
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील खडकी गावात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुर्या हॉटेल, लॉजिंग वर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीसांनी सहा महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवीश शेट्टी (सध्या रा. रा. सूर्य हॉटेल खडकी, तालुका दौंड जी पुणे मूळ राहणार मेलासुर तालुका कुंदापूर जिल्हा उडपी राज्य कर्नाटक ),
3) बब्बी शेठ 4) सुनील जामगे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) असे या आरोपीचे नावे आहेत. शनिवारी ( दि ९) रोजी रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
खडकी येथील सुर्या हॉटेल व लॉजींगवर वेश्याव्यवसाय सुरु असलेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी या लाॅजवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी 6 महीलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व स्वतःची उपजीविका चलवण्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीसांनी ६ महिला व वेश्याव्यवसाय करण्यासाठी लागणारा एकूण २९ हजार २०० रोख रक्कम व मुद्देमाला ताब्यात घेतला.. याबाबत पुणे सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी फिर्याद दिल्याने दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, खडकी येथे सुर्या लाॅजवर तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने मागील अनेक दिवसांपासून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरु होता, एका कारखान्याच्या संचालकाची या वेश्या व्यवसायात भागीदारी असल्याचं बोललं जातंय . या व्यवसायात संबंधित व्यवसाय चालकांकडून स्थानिक गावगुंड ठेवण्यात आले होते. या लाॅजवर यापुर्वी दोन वेळा पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली होती.