एकलव्य आदिवासी समाजसेवी संस्थेची स्थापना..

Read Time:2 Minute, 12 Second

माधव तल्हा पालघर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना डहाणू तालुका अध्यक्ष उमेश गोवरी यांनी एकलव्य आदिवासी समाजसेवी संस्था स्थापन करून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संस्थेचे उदघाटन केले आहे. डहाणू पूर्व भागात गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागात उमेश गोवारी हे समाजकार्य करत आहेत. दिनदूबळ्यांच्या मदतीला मेहमीच धावून जाणारे उमेश गोवारी यांनी आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल उचलले असून त्यांना या भागातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. एकलव्य आदिवासी समाजसेवी संस्था च्या निमित्ताने आदिवासी समाजासाठी काम करण्याची संधी तरुणांना लाभत असल्याचे तरुनवर्गाचे म्हणणे आहे. उमेश गोवारी यांच्या ह्या नवीन उपक्रमाला ग्रामीण भागातुन चांगला प्रतिसाद लाभत असून लोकांकडून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विवळवेढे महालक्ष्मी मंदिर येथे महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन संस्थेचे उदघाटन करण्यात आले असून ह्यावेळेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश गोपाळ गोवारी, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष संतोष देशमुख, संस्था उपाध्यक्ष मोहित धांगडा, सचिव साईश भोये, सहसचिव चेतन पाचलकर खजिनदार सुनील मोर, सदस्य दिपू गोवारी,अंकुश भोईर,ओमकार नाईक,मनोज कदम,राहुल घाटाळ आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!