दर्जेदार शिक्षणातून सक्षम पिढी घडवूया – मा श्री शिरिषदादा चौधरी

—————————————-
राजु तडवी फैजपुर

शिक्षण हीच व्यक्तिगत, सामाजिक आणि वैश्विक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शैक्षणिक संस्था समाज उद्धाराचे केंद्र बनली पाहिजे. सर्वांच्या सहभागातून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभारणीसाठी कटिबद्ध राहू असे मत मा श्री शिरिषदादा चौधरी अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपुर तथा आमदार रावेर – यावल विधानसभा मतदार संघ यांनी व्यक्त केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आयोजित संस्था पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

तापी परिसर विद्या मंडळ, फैजपुर ची कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मा संस्था पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री शिरिषदादा चौधरी हे होते.

यावेळी प्रास्ताविका च्या माध्यमातून प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी कर्मयोगी दादासाहेब धनाजी नाना चौधरी, लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा समृद्ध वारसा विद्यमान आमदार तथा अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर यांनी चालवला असून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रात धनाजी नाना महाविद्यालयाने दर्जेदार शिक्षण पुरवण्यात नावलौकिक मिळविला आहे. आतापर्यंत मिळवलेल्या सर्व उपलब्धीचे श्रेय मा संस्था पदाधिकारी यांनाच जाते असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी – अध्यक्ष, प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी – उपाध्यक्ष, श्री मिलिंद शंकरराव वाघुळदे – उपाध्यक्ष, श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी – चेअरमन, प्रा किशोर रामदास चौधरी – व्हाईस चेअरमन, प्रा मुरलीधर तोताराम फिरके – सचिव , प्रा नंदकुमार आसाराम भंगाळे – सहसचिव यासोबत कार्यकारी मंडळ सदस्य श्री ओंकार वामन सराफ, डॉ शशिकांत सदाशिव पाटील, श्री संजय काशिनाथ चौधरी, यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एल चौधरी, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पिंगला धांडे हे उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून कार्य केल्याबद्दल प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्राचार्य डॉ आर एल चौधरी, मानद सचिव प्राचार्य डॉ पी आर चौधरी व निवडणूक सहाय्यक श्री नितीन सपकाळे यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त प्राध्यापक व कर्मचारी यांचा शासन अटींच्या आधिन राहून सेवापूर्ती सोहळा आयोजित केला गेला नव्हता त्याचे औचित्य साधून उपस्थित मा संस्था पदाधिकारी यांच्या वतीने उपाध्यक्ष डॉ सुधाकर काशीनाथ चौधरी यांच्या शुभहस्ते डॉ सिंधू एन भंगाळे, प्रा एम के नाथ , प्रा वाय जी वारके, श्री पी जी महाजन, श्री हुसेन तडवी यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था पदाधिकार्‍यांच्या वतीने उपाध्यक्ष – डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, सहसचिव- प्रा नंदकुमार आसाराम भंगाळे, कार्यकारी मंडळ सदस्य – डॉ शशिकांत सदाशिव पाटील व प्राध्यापकांच्या वतीने डॉ सतीश चावदस चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने श्री आर एस सावकारे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्ट. डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!