दिव्यांग व्यक्तींना रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार न मिळाल्याने बेरोजगार भत्ता द्या:-चाँद शेख

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

सावली दिव्यांग संस्थेचे शेवगाव तहसीलदार यांना निवेदन

राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच रोजगार हमी योजना आयुक्त नाशिक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तीना बेरोजगारीचा सामना करून उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दिव्यांग व्यक्तींना रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणेबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार शेवगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी तहसीलदार शेवगाव,गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव,मा.कृषी अधिकारी साहेब शेवगाव यांच्याकडे रोजगार हमी योजना अंतर्गत काम मिळणे कामी अर्ज सादर केले होते.त्यानुसार रोजगार मागणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींना जॉबकार्ड काढण्यास सांगितले दिव्यांग व्यक्तीनी जॉबकार्ड काढले.त्यानंतर नमुना नंबर ०१ अर्ज भरण्यास सांगितले. दिव्यांग व्यक्तींनी विहित नमुन्यात रोजगार मागणी केली.तरी देखील दिव्यांग व्यक्तींना नमुना नंबर ०४ मधील नमुन्यात अर्ज भरण्यासाठी सांगितले दिव्यांग बांधवांनी ते देखील केली परंतु शासनाच्या कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय किंवा कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी दिव्यांग व्यक्तीना रोजगार उपलब्ध करून देणेबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींचे हजेरी मस्टर देखील भरण्यात आलेले नाही. रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
सावली दिव्यांग संस्था संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यातील ज्या दिव्यांग व्यक्तीनी रोजगार हमी योजना अंतर्गत कामाची मागणी केली होती परंतु त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.आशा दिव्यांग व्यक्तीना रोजगार पासून ठेवले असल्याने बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांच्याकडे सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख व सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुका उपाध्यक्ष संभाजी गुठे यांनी निवेदन दिले आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच रोजगार हमी योजना आयुक्त यांनी कोरोना काळात दिव्यांग व्यक्तींना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून दिव्यांग व्यक्तींना रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणेबाबत सूचना केल्या होत्या परंतु आज पर्यंत दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळाला नाही.दिव्यांग हे रोजगाराच्या हक्कापासून वंचीत आहेत.रोजगार उपलब्ध न झालेल्या दिव्यांगांना बेरोजगार भत्ता मिळावा
चाँद कादर शेख उपाध्यक्ष सावली दिव्यांग संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!