बाभळगांव येथील अपंग व्यक्ती दिगांबर गाडेकर महिन्यापासून बेपत्ता.

Read Time:1 Minute, 28 Second

दिंद्रुड/ प्रतिनिधी
माजलगांव तालुक्यातील बाभळगांव येथील दिगांबर हरिभाऊ गाडेकर,वय वर्षे ३५ हा व्यक्ती एक महिन्यापासून बेपत्ता झाला आहे.अधिक माहिती अशी की, दिनांक ३०-०९-२०२१ रोजी सकाळी आठ वाजता बाबळगाव येथून कोणास काही न सांगता घरातून निघून गेला आहे.
तो अद्याप परत आलेला नाही. त्याचा घरच्यांनी
नातेवाईकाकडे इकडे तिकडे शोध घेतला. परंतु तो अद्याप न मिळून आल्याने त्याच्या भावाने दिंद्रुड पोलीस स्टेशनला फिर्याद नोंद केली आहे. सदर व्यक्ती हा उजव्या पायात पंजामध्ये अपंग आहे. जाताना अंगात गुलाबी रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, पायात चप्पल, सावळा रंग,दाढी वाढलेली अशा अवस्थेत होता. दिंद्रुड पोलीस स्टेशन कडून शोध घेणे चालू आहे. अशा वर्णनाचा सदर व्यक्ती कोठे कोणास आढळून आल्यास,
86 05253121 किंवा 7507184663 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा,
अशी नातेवाइकाकडून विनंती करण्यात आली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!