
दिव्यांगत्वावर मात करुन निर्मला यांनी धारण केली इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय,दिल्ली एम.एस.डब्लु ची पदवी
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेकडुन सन्मान
शेवगाव- प्रत्येकाच्या जिवनात सुख दुख: येत असतात त्यावर मात करून जीवन कस जगाव याचे उत्तम प्रेरणादायी उदाहरण पारनेर तालुक्यातील सौ निर्मला भालेकर यांनी समाजासमोर उभे केले आहे.
जन्मत:च विलक्षण शारीरीक अपंगत्व असतांनाही अपंगत्व शाप नसून एक वरदान मानुन पारनेर तालुक्यातील निर्मला भालेकर यांनी आपल्या जिद्दीच्या,मेहनतीचे व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर घर संसार,प्रपंच, दिव्यांग क्षेत्रात सामाजिक कार्य तसेच पोल्टी सांभाळुन सामाजीक क्षेत्रातील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय,दिल्ली या विद्यापीठातुन एम.एस.डब्ल्यु ची पदवी धारण करून आगळा वेगळा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
एम.एस.डब्ल्यु अभ्यासक्रमाची पदवी मिळवल्याबद्दल सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या वतीने सौ.निर्मला भालेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे,उपाध्यक्ष चांद शेख,अरूण गवळी,शारदा गवळी आदी उपस्थीत होते.
यावेळी बोलतांना चांद शेख म्हणाले की निर्मला भालेकर यांचे जिवन अत्यंत खडतर असतांनाही त्यांनी धडधाकट लोकांना लाजवेल अशी कामगीरी केली असुन शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी दिव्यांग क्षेत्रात सामाजिक कार्य करत पोल्ट्री व्यवसायात भरारी घेतली असुन आम्हा दिव्यांगासाठी निर्मला भालेकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.सध्या त्या सावली दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा पदी कार्य करत असून दिव्यांग सेवा देखील करत आहे.
सौ निर्मला भालेकर यांच्या जिवनाचा संघर्ष आम्ही जवळुन पाहीला असुन त्यांची जिद्द ही आम्हालाही उर्जा देत असते काम कोनतेही असो सर्वात आघाडीवर निर्मला भालेकर असतात त्यांची अशीच उत्तोरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आमची त्यांना कायम साथ राहील असे सावलीचे बाबासाहेब महापुरे यांनी सांगीतले.
जन्मताच अपंगत्व आले नंतर जिवन जगतांना कीती अडचणीचा सामना करावा लागतो याचा वेळोवेळी अनुभव येतो परंतु मी याची कधी तमा बाळगली नाही माझ्या शिक्षणाचा उपयोग मी दिव्यांगबांधवाच्या पुनर्वसनासाठी करणार आहे मला यासाठी कायम सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे सहकार्य मिळालेले आहे.
सौ.निर्मला भालेकर
महिला जिल्हाध्याक्षा – सावली दिव्यांग संघटना अहमदनगर