जयराम वाघमारे यांना जय भगवान युवा प्रतिष्ठान दैत्य नांदूर यांचा समाज रत्न 2021 चा पुरस्कार जाहीर

चकलांबा प्रतिनिधी:-
संघर्ष क्रिएशन चे मालक व शिवसंघर्ष न्युज चे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख जयराम वाघमारे यांना प्रतिष्ठित जय भगवान युवा प्रतिष्ठान यांचा समाजरत्न पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे लॉकडाऊन व कोव्हीड काळात विविध सामाजिक कामे कोव्हीड सेंटरला भेट व सेंटरला मदत,रक्तदान शिबिर,अनाथालयास मदत,राशन,मास्क,सॅनिटायझर तसेच विविध सामाजिक संस्थांना मदत असे सामाजिक कार्य केले आहे या सर्व सामाजिक कामांची दखल घेत दैत्य नांदूर तालुका पाथर्डी येथील जय भगवान युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष माननीय अजिनाथ पालवे यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून रविवार दिनांक 7/11/2021 रोजी भाऊ बाबा मंदिर दैत्य नांदूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे या कार्यक्रमासाठी व या निवडीबद्दल जय राम वाघमारे यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!