बोलठाण ग्राम पंचायत विश्वासात घेत नसल्याचा सुनिता बनकराचा आरोप

Read Time:3 Minute, 41 Second

(प्रातिनिधी,मुक्ताराम बागुल) नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील ग्राम पंचायत ही एकुण 13 सदस्यांची असुन या ग्राम पंचायत चे सरपंच,ग्राम सेवक हे मला विश्वासात न घेता कामकाज करत असुन येथील बसस्थानक जमीनदोस्त केले आहे. या ठिकाणी ते व्यापारी गाले करण्याचे विचारात असलेचे समजते परंतु येथे पुर्वी जसे बसस्थानक होते तेवढेच बसस्थानक बांधून या बसस्थानकाचे दोन्ही बाजूंनी लेडीज व पुरुष यांचेसाठी शौचालय बांधणेत यावे आसे बोलठाण ग्राम पंचायत सदस्या सौ.सुनिता बनकर यांनी दिलेल्या तक्रारीत तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती आशी की बोलठाण येथील बसस्थानक सरपंच,ग्राम सेवक यांनी पाडले असुन येथील जागेवर व्यापारी गाले करण्याचे विचारात असलेचे तक्रारी बाबत ग्रामसेवक भगवान जाधव यांनी सांगितले की या बसस्थानकाचे जागेवरच बसस्थानक बांधणार असुन लेडीज साठी शौचालय देखील बांधणार असलेचे ग्रामसेवक जाधव यांनी सांगितले. तसेच येथील ग्राम पंचायतचे गट नंबर 358 मध्ये सर्व समाजाच्या स्मशान भुमिची नोंद व इतर हक्क होणेबाबत आणि गाले बांधण्याचे प्लॅन बदलुन त्याच बसस्थानकाचे जागेवरच बसस्थानक बांधून दोन्ही बाजूंनी लेडीज व पुरुष यांचेसाठी शौचालयचा समावेश करण्यात यावा अशी तक्रार तहसिल कार्यालय नांदगाव यांचेकडे दिनांक 11/10/2021 रोजी तक्रार केली आहे या तक्रारीत ग्राम पंचायत सदस्या सौ सुनिता बनकर यांनी म्हटले आहे की बोलठाण ग्राम पंचायत कडे मासिक सभेत इतर अधिकार नोंद करणेबाबत वारंवार अर्ज करुन देखील ग्रामस्थांचे व मझ्या अर्जाचा विचार केलेला नाही. व अनुसूचित जाती,जमाती,लिंगायत,वडार समाजासाठी स्मशानभुमिचा इतर अधिकारात नोंद करणेबाबत,अतिक्रमण जागा मोजणी करणे यास प्रशासकीय मंजूरी सरपंच व ग्राम सेवक करत नाही असा आरोप ग्राम पंचायत सदस्या सुनिता बनकर यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. यावर ग्रामसेवक भगवान जाधव यांनी सांगितले की आम्ही तहसिल कार्यालय यांना ग्राम पंचायत चा ठराव आणि ग्राम पंचायत चे पत्र दिले असुन त्याची पोहच आमच्या कडे आहे असे सांगितले बोलठाण ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या सौ सुनिता बनकर यांनी म्हटले आहे की वरील मागणीची दखल घेवुन कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही ग्राम पंचायत बोलठाण समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!