बँक ऑफ इंडिया हेड ऑफिस च्या कर्मचाऱ्यांनी केली आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी..

Read Time:1 Minute, 57 Second

प्रतिनिधी:- निलम ढोले

आज दिनांक 4 नोव्हेंबर 2021 रोजी योगेश वनघरे फाउंडेशन च्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया हेड ऑफिस चे कर्मचारी यांनी लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून कोळीशी कातकरवाडी तालुका मुरबाड येथील कुटुंबाना दिवाळीचा फराळ तर लहान मुलांना कपडे व ड्राय फ्रूट चे वाटप करून आपली दिवाळी साजरी केली.तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागूचीवाडी तालुका कर्जत येथील 56 शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व फराळ वाटप करून आपली दिवाळी शालेय मुलांसोबत साजरी केली. यावेळी बँक ऑफ इंडिया हेड ऑफिस च्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व पटवून दिले.तसेच मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेऊन मुलांना हर्षभरीत केले.

कार्यक्रम समयी योगेश वनघरे फाउंडेशन चे संस्थापक तथा अध्यक्ष श्री योगेशजी वनघरे सर,बँक ऑफ इंडिया हेड ऑफिस चे अजय सावंत,विकास तातळे,विशाल इंगळे,संजय खापरे,राजू नवघरकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश पारधी,बबन निरगुडा,ग्रा.पं.सदस्या जानकी पारधी,शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ श्री राम ढोले तसेच शाळा मुख्याध्यापक श्री हरीचंद्र आढारी,तसेच विद्यार्थी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!