मांजरपाडा योजनेत नांदगाव तालुक्याचा समावेश होणार

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल ÷ नांदगाव तालुक्याचा नारपार ÷ कोकण जलसिंचन योजनेच्या तिसर्या आणि चौथ्या टपयात मांजरपाडा योजनेत समावेश करण्यात येणार आसुन मंत्रिमंडळाच्या मान्यतेने त्यावर शिक्कामोर्तब केला जाईल अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नांदगाव तालुका जलहकक समितीचया शिष्टमंडळास दिली.
मांजरपाडयाचे पाणी नांदगाव तालुक्यातही देण्याबाबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विकासकामा पुस्तिकेदवारे आश्वासन दिलेले होते. आवघे 5%टक्के जलसिंचन असलेल्या नांदगाव तालुक्याला पाणी देण्यासाठी मांजरपाडा (देवसाने)
हाच एकमेव पर्याय असुन पालकमंत्री यांनी अश्वासन पूर्तीच्या दिशेने पाऊल उचलत नांदगाव तालुक्याला दिलासा द्यावा म्हणुन नांदगाव तालुका जलहकक समितीने ना. छगन भुजबळ यांचा कार्यालयात भेट घेतली असता त्यानी वरील माहिती दिली.
नांदगाव तालुका जलहकक समिती कार्यकर्तेशी सविस्तर चर्चा करुन येवला नंतर नांदगाव तालुक्यालाही मांजरपाडा योजनेतून पाणी देण्याबाबत दिशा ठरविण्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी मान्य केले आहे. दिवाळी
नंतर नाशिक येथे बैठक घेण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात विशाल बडघुले,अंबादास मोरे,
पुंडलिक कचरे,तर समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी,रमेश खरे,युनुस पठाण,शमशाद सय्यद,सुषमा तिवारी आदी
जनाचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!