निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे कुरकुंभचे सरपंच उपसरपंच अपात्र..

Read Time:3 Minute, 22 Second

दौंड-:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राहुल भोसले व विद्यमान उपसरपंच विनोद शितोळे यांनी निवडणूक खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत . कुरकुंभ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सन-२०१८ मध्ये झाली होती. यामध्ये राहुल भोसले हे सरपंच म्हणून जनतेतून निवडून आले होते. तर विनोद शितोळे हे सदस्यपदी म्हणून निवडून आले आहेत.सध्या शितोळे हे विद्यमान उपसरपंच आहेत.
कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले व विद्यमान उपसरपंच विनोद शितोळे यांनी सन २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीत केलेला खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर केला नाही . सादर केलेले प्रतिज्ञापत्र व बिलांवरती सह्या व तारीख नसणे आदी मुद्द्यांच्या आधारे ग्रामपंचायत अधिनियम १४ ( ब ) मधील तरतुदीचा भंग झाल्यामुळे संदीप भागवत यांनी सरपंच भोसले यांना , तर संदीप साळुंके यांनी सदस्य व उपसरपंच शितोळे यांना अपात्र ठरविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती . मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावल्याने भागवत व साळुंके यांनी त्यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. यासंदर्भात संबंधितांनी दोन्ही बाजूचे जबाब ऐकून घेऊन २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निकाल दिला . त्यामध्ये दोन्ही बाजूचे जबाब घेऊन अपिलकर्त्यांचे अपील मान्य केले . तसेच , याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जुलै २०१९ रोजी दिलेला आदेश रद्द केला असून , मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( ब ) (१) (अ) नुसार सरपंच व सदस्याला अपात्र ठरविण्याची आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत . या अपात्रतेबाबत सरपंच भोसले व उपसरपंच शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता , आपल्याला कुठल्याही प्रकारचा निकाल हाती मिळाला नसल्याचे सांगितले. तसेच आपण सर्व खर्चाचा तपशील वेळेत व नियमानुसार दाखल केला असल्याचा दावा केला आहे . विरोधकांना ग्रामस्थांनी मतदानाच्या माध्यमातून नाकारल्याने संबंधित हे वैफल्यग्रस्त झाल्याचं यावेळी बोलताना सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!