नवरत्न पुरस्कार सोहळा एकमेवाद्वितीय उपक्रम– कमलाकर वाणी

राजु तडवी फैजपुर

पत्रकार संस्था,फैजपुरच्या वतीने आयोजित नवरत्न सन्मान व जेष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा समाजासाठी आदर्शवत असून समाजातील चांगले कार्य करणाऱ्यांचा गौरव करून अनुकरणीय उदाहरण प्रस्थापित केले आहे असे गौरवोद्गार जेष्ठ पत्रकार एमा कमलाकर वाणी यांनी व्यक्त केले.
ते पत्रकार संस्था,फैजपूर संलग्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या तर्फे आयोजित नवरत्न पुरस्कार व जेष्ठ पत्रकार गौरव सोहळा या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी कमलाकर वाणी(मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ मुंबई चे जेष्ठ पत्रकार) होते.तर विशेष अतिथी म्हणून खंडेराव वाडी संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज,आ शिरिष दादा चौधरी,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पंचायत समिती सभापती सौ पल्लवीताई चौधरी,मसाका चेअरमन शरद दादा महाजन,जिल्हा दूध संघ संचालक तथा नगरसेवक हेमराज चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर राजू तडवी,माजी जि प सदस्य भरत महाजन,डॉ एस एस पाटील(माजी प्राचार्य ),जावेद जनाब मारूळ,काँग्रेस गटनेता कलीम मन्यार,राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान,माजी नगरसेवक जफर शेख भाजप अल्पसंख्यांक युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष आरीफ शेख पि आर पिचे जिल्हा अध्यक्ष आरीफ कलीम यांच्यासह यावल रावेर परिसरातील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक,अध्यात्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सन्मान सोहळ्याची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्यासोबत मृत्यू पावलेल्या तेरा वीर योद्धा साठी व वर्षभरातून सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय व पत्रकारिता या क्षेत्रातील दिवंगत लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर अग्रवाल यांनी केले.या सन्मान सोहळ्यात उद्योग रत्न पुरस्कार सुनील लक्ष्मण वाडे (संचालक शुभम फेशन मोल),स्त्री शक्ती पुरस्कार सौ संगीता भामरे,कृषिरत्न पुरस्कार धनेश्वर लीलाधर भोळे न्हावी,समाज भूषण पुरस्कार प्राध्यापक असलम हाजी बाबू तडवी फैजपुर,समाज भूषण पुरस्कार शेख इरफान,(अध्यक्ष एकता फौंडेशन) धन्वंतरी पुरस्कार डॉ दानिश हाजी शेख निसार, विद्याधन रत्न पुरस्कार शिक्षक बी डी महाले सर फैजपूर,दिव्यांग सेवक पुरस्कार शेख अहेसान कुरेशी,जनसेवा पुरस्कार शेख वसीम जनाब,धन्वंतरी पुरस्कार डॉ अविनाश बऱ्हाटे, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ सावदा,केमिस्ट रत्न पुरस्कार दीपक लोमटे,मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.याच बरोबर देश सेवेसाठी वर्ष बीएसएफ मध्ये डोळ्यात तेल ओतून देशाची रक्षा करणारे माजी सैनिक हवालदार युवराज देवराम गाढे यांचाही सन्मानचिन्ह, गोल्ड मेडल,देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणाऱ्याना वीर योद्धा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात सौरभ संजय वाणी, सुभाष ओंकार पवार,लवकुश दयाराम राठोड, मोहसीन शेख युनूस,शबीना आर खान,अध्यक्ष जर्जीस फाउंडेशन वरणगाव,सौ दिपाली झोपे,हाजी रशीद जमादार खान यांचा सन्मानपत्र,शाल,गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला.तसेच या गौरव सोहळ्यात यावल रावेर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन प्रा डॉ राजेंद्र राजपूत व प्रा राजू पटेल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संस्था अध्यक्ष शेख फारूक मण्यार व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!