दौंड तालुक्यात “शिव संपर्क” अभियानास सुरवात….

खासदार कृपाल तुमाने यांनी घेतली प्रमुख पदाधिका-यांसोबत बैठक !

दौंड :आलिम सय्यद ,

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून, बारामती लोकसभा मतदार संघाचे शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघ,नागपुर खासदार कृपालजी तुमाणे यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यात गुरुवार (दि.२६ मे) रोजी शिवसंपर्क अभियानाची सुरवात झाली. शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्याच दिवशी खासदार तुमाने यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ,चौफुला येथे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली.

यावेळी खासदार तुमाने म्हणाले की, शिवसंपर्क अभियानाचे पुढील चार दिवस प्रत्येक शिवसैनिकांनी तालुक्यातील प्रत्येक गावात ,प्रत्त्येक घरातील नागरिकापर्यंत संपर्क करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आवाहन केले. शिव संपर्क अभियान हे शिवसेना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रभावी माध्यम असून, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने केलेली लोकाभिमुख कामे राज्यातील जनतेच्या घराघरात पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे.

याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचवून पक्ष बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियान यशस्वी करावे यावेळी पासलकर यांनी शिवसंपर्क अभियानाची पुढील ४ दिवसाची रूपरेषा स्पष्ट केली. दौंड तालुक्यात शिवसंपर्क अभियानाची सुरवात ( दि.२६) पासून पंचायत लिंगाळी पं.स गण अशी झालेली असून, शुक्रवार (दि.२७ ) रोजी केडगाव प.स गण , बोरीपार्धी प.स गण, पारगाव प.स गण, कानगाव प.स. गण , शनिवार (दि.२८) रोजी भांडगाव प.स गण , यवत प.स गण ,खामगाव प.स गण राहू प.स गण रविवार ( दि.२९ ) रोजी पाटस प.स गण , खडकी प.स गण , व दौंड शहर असे शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी सांगितले.

यावेळी मा. खासदार कृपाल तुमाने , बारामती लोकसभा महिला संपर्क संघटिका शालिनीताई देशपांडे, शिवसेना वक्ते विठ्ठल पाटील ढमाळे, महिला जिल्हा सह संपर्क संघटिका स्वातीताई ढमाले, महिला जिल्हा संघटिका निताताई भोसले, शिवसंपर्क अभियान निरीक्षक हेमंतजी रासकर, राकेशजी तटकरे, व इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी अनेक उच्च शिक्षित तरूणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला सर्वाचे खासदार कृपाल तुमाने यांनी शिवसेनेत स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!