शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष,शहरप्रमुखास अटक..

नगरपरिषदेच्या मुकादमास मारहाण प्रकरण

शेवगाव

शेवगाव नगरपरिषद महिला कर्मचाऱ्यांस शिवीगाळ करून मुकादमास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी किसनराव काटे व शहरप्रमुख सिद्धार्थ किसनराव काटे (रा. शेवगाव) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नगरपरिषदेचे मुकादम सुरेश जयसिंग चव्हाण (वय ५०, रा. पैठण रोड, शेवगाव यांनी फिर्याद दाखल केली.

शुक्रवारी (ता. ३०) शहरातील शास्त्रीनगर नगरपरिषदेच्या सफाई कामगार
शकुंतला संजय वाघमारे व शोभा नंदकिशोर मोहिते या रस्त्यावर सफाईचे काम करीत होत्या. याच वेळी सिद्धार्थ काटे यांनी, तुम्ही चांगले काम करीत नाही या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच वाद मिटविण्यासाठी मुकादम कर्मचारी सुरेश जयसिंग चव्हाण व रमेश भागूजी खरात यांनाही सिद्धार्थ व शिवाजी काटे यांनी शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार चव्हाण यांनी दिली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल हे करीत आहेत.

महाराष्ट्र न्युज टेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!