जव्हार कुटीर रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांना चादर व ब्लॅंकेट चे वाटप

जव्हार दी.९-१०-२०२२ रोजी – दरवर्षी प्रमाणे ईद-ए-मिलादुन्नबीचा औचित साधून अरशद कासम कोतवाल यांच्यावतीने जव्हार कुटीर रुग्णालय या ठिकाणी गोरगरीब आदिवासी ,
तसेच सर्व समाजातील रुग्णांना ब्लॅंकेट व चादरी वाटप करण्यात आले.
जव्हार कुटीर रुग्णालयात रुग्णांना अरशद कोतवाल व त्यांचे मित्रमंडळी व मुस्लिम समाजातर्फे २०० ब्लॅंकेट व चादरी वाटप करण्यात आले , दरम्यान मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर .
यांच्या संदेश म्हणजेच आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.
जीवनात प्रत्येक व्यक्तीला बरोबरीचा मान देणे ,
सर्व धर्माचा आदर करणे , गोरगरीब व्यक्तीला मदत करणे ,या दिवशी गरिबांना जेवणाचा नियोजन करणे कोणाचाही हक्क न मारणे , व त्या व्यक्तीला हक्क मिळवून देणे , रंजल्यां गांजल्यांच्या उद्धार करणे ,
अशा विविध स्वरूपाचे प्रत्येक व्यक्तीला मदत करणे .
अशा प्रेषित मोहम्मद पैगंबराचा उपदेशा प्रमाणे .
सदरचे वाटप अरशद कोतवाल व त्यांचे सहकारी मित्रमंडळी व समाज बांधव यांनी केले .
सदर कार्यक्रमास जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे .तसेच नगरसेवक रहीम लुलानिया , अजमुद्दीन कोतवाल , दानिश शेख , अदि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते .
दरम्यान कुटीर रुग्णालय जव्हार अधीक्षक डॉ.रामदास मराड यांनी सर्व मुस्लिम बांधवांना या समाज सेवेसाठी व कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले व त्यांचे मनापासून अभिनंदन केले ।……
———————–/——————
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!