
३ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य
दि १६-९-२०२३ :- 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य
जव्हार तालुका अतिदुर्गम भागात अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को ऑफ सोसायटी लिमिटेड संचलित व खासदार राजेंद्र गावित यांच्या संकल्पनेतून 3 हजार महिलांना रोजगार मिळणार आहे …….
प्रगत शिवणकाम कौशल्य विकास केंद्र घाची हॉल येथे खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत प्रथम कार्यक्रम संपन्न झाला ….
या कार्यक्रमा दरम्यान अजंता ॲग्रो मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अजित घोसाळकर यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करत जव्हार तालुका हा अतिदुर्ग भाग असल्यामुळे येथील महिलांना कुठल्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे येथील महिलांना खासदार राजेंद्र गावित यांच्या संकल्पनेतून रोजगार मिळाला आहे …
अशाप्रकारे जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा देता येईल यासाठी खासदार राजेंद्र गावित यांची मदत घेऊन अनेक प्रकारचे रोजगार येथील महिलांना उपलब्ध करून देणार
अशी ग्वाही संस्थापक अध्यक्ष अजित घोसाळकर यांनी दिली ……
त्याचबरोबर खासदार राजेंद्र गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले येणाऱ्या काळात तीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार………..
दर महिन्याला ३० ते ३५ हजार शर्ट पॅन्ट बॅग असे अनेक प्रकारचे वस्तू या महिलांच्या माध्यमातून तयार होतील असे आश्वासन दिले ….
या कार्यक्रमा प्रसंगी पालघर जिल्हा अध्यक्ष वसंत चव्हाण ,अजंता ॲग्रो सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अजित घोसाळकर , सौ रुपाली गावित व अदिवासी सामाजिक कार्यकर्ता भावना पवार , पत्रकार मनोज कांमळी ,काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुख फकृद्दीन मुल्ला, राष्ट्रवादी पक्ष शहर प्रमुख आश्रफ घाची , महाराष्ट्र न्यूज १० कार्यकारी संपादक जहीर शेख सरपंच कशीवली निलेश भोये करण पवार आदी मान्यवर उपस्थित होते ।…..
जव्हार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट।…….