सिद्दीका सलीम पठाण हीचा आयुष्यातील पहिला रोजा..

————-
शेवगाव(प्रतिनिधी)
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून जिकडे-तिकडे आनंदाचे व भक्तीभावाचे वातावरण दिसून येत आहे. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांना रोजे ठेवणे फर्ज (अनिवार्य) आहे. महिनाभर त्यामुळे सर्व मुस्लिम महिला पुरुष व युवक युवती इतकेच नव्हे तर लहान मुले-मुली सुद्धा स्वेच्छेने रोजे ठेवून, नमाज व कुरआन पठण करून अल्लाहची (ईश्वराची) इबादत (उपासना) करतात. यामध्ये चिमुकले सुध्दा मागे नसतात. त्यांच्यातही रोजे ठेवण्याची व अल्लाहची इबादत करण्याची चढाओढ असते. या पवित्र महिन्यात लहान मुले-मुलीही रोजा ठेवून अल्लाहकडे दुआ (प्रार्थना) करतात. रविवार दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र न्युज 10 संपादक सलीम पठाण यांची मुलगी सिद्दीका वय वर्षे ५ या चिमुकलीने पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पुर्ण केला.
दिवसभर रोजा ठेवल्यानंतर या पहिल्या रोजा प्रित्यर्थ तीचा पुष्पहार घालून सूर्यस्तानंतर तीची रोजा खुलाई (इफ्तार) करण्यात आला आहे. (म्हणजे उपवास सोडण्यात आला.) दिवसभर रोजा ठेवून व नमाज पठण करून दुआ केली. त्यामुळे त्यांच्या परिवारात उत्साहाचे वातावरण असून सिद्दीकाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!