समाज सेवक अरशद कासम कोतवाल यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे सरकारी दवाखान्यात रुग्णांना ब्लॅंकेट वाटप

समाज सेवक अरशद कासम कोतवाल यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे सरकारी दवाखान्यात रुग्णांना ब्लॅंकेट वाटप
———————————————-
दी. २८-९-२०२३ रोजी दरवर्षी प्रमाणे ईद मिलादुन्नबीचा अवचित साधून जव्हार शहरातील समाज सेवक अरशद कोतवाल यांच्याकडून उप जिल्हा कुटीर रुग्णालय जव्हार या सरकारी दवाखान्यात गोरगरीब आदिवासी रुग्णांना तसेच सर्व समाजातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना चादर व ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम केला जातो………..
मुस्लिम समाजामध्ये पूर्ण वर्षभरात सर्वात जास्त पवित्र व मोठा सण म्हणजेच ईद-ए-मिलादुन्नबी…………..
या सणाच्या दिवशी मुस्लिम समाजाकडून गोरगरीब नागरिकांची विविध प्रकारे मदत केली जाते………..
यात प्रामुख्याने भंडाऱ्याचे आयोजन मोठ्या संख्येने नागरिकांना दिला जातो …..
तसेच जास्त प्रमाणात मुस्लिम समाजातील व्यक्ती गोरगरिबांना कपडे वाटप भांडी वाटप स्कूल बॅग जेवण्याचे डबे मुलांसाठी शाळेत लागणारी विविध प्रकारचे वस्तू वाटप करत असतात ….
असाच एक समाजसेवक त्याचे नाव आहे अरशद कासम कोतवाल दरवर्षी याच ईद-ए-मिलादुन्नबीचा अवचित साधून ..
कुटीर रुग्णालय सरकारी दवाखाना जव्हार येथील गोरगरीब आदिवासी तसेच सर्व समाजातील रुग्णांना चादर व ब्लॅंकेट वाटप करत असतो ….
यावर्षी त्यांनी दवाखान्यात २०० ते ३०० ब्लॅकेट व चादर वाटप केले………
सरकारी दवाखान्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मराड व जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे साहेब , पी एस आय अनील दिघोडे , खादे साहेब तसेच गोपनीय अमलदार राठोड सर यांच्या हस्ते गरीब गरजू रुग्णांना चादर व ब्लॅंकेट देण्यात आले ….
या कार्यक्रमा दरम्यान रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रामदास मराड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले ….
या कार्यक्रमासाठी शहरातील माजी नगरसेवक रहीम लुलानिया , ज्येष्ठ मार्गदर्शक जब्बार मेमन , अज्जू कोतवाल , इमरान मेमन ,अशपाक शेख , तसेच अदी कार्यकर्ते उपस्थित होते …
अरशद कासम कोतवाल यांच्या कडून दरवर्षी होणारा या समाज सेवेच्या कार्यास तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचे वर्षाव होत आहे।….. *जव्हार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट।….*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!