‘फराज’चा अॅन्ड एक्सप्लोर एचडीवर प्रीमिअर, हंसल मेहता यांच्या मास्टरफूल निर्मितीचे अनावरण..

तुमच्या कॅलेंडरवर ‘फराज’च्या मनाची पकड घेणाऱ्या अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनीवरील प्रीमिअरसाठी नोंद करून ठेवा. वाहिनी आपल्या लक्षवेधी आणि प्रेरणादायी वैविध्यपूर्ण कॉन्टेन्टसाठी नावाजलेली आहे. 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनीवर प्रीमिअर होत असलेल्या ह्या शक्तीशाली मास्टरपीसचे दिग्दर्शन विख्यात हंसल मेहता यांनी केले असून हा चित्रपट 2016 च्या ढाका दहशतवादी हल्ल्यांवर आधारलेला आहे. ह्या चित्रपटात आदित्य रावल आणि झहान कपूर ह्या डायनॅमिक जोडीच्या भूमिका आहेत. “अनसरेंडर टू टेरर” हा चित्रपट चिवटपणा आणि धैर्य यांची गहन कथा सादर करतो. ही लक्षवेधी कथा खास अॅन्डएक्सप्लोरएचडी तुमच्यासाठी घेऊन येत असून अनरूटिन, अनएक्सपेक्टेड आणि अनफॉर्म्युला असलेले गुंग करणारे आणि वैविध्यपूर्ण कॉन्टेन्ट सातत्याने प्रदान करण्यासाठी ही वाहिनी मानली जाते.

“फराज” एका टिपीकल होस्टेज थरारपटाच्या पलिकडे जाऊन विकासात्मक शिक्षण घेतलेल्या सुस्थितीतील व्यक्तीही कशाप्रकारे अतिरेकी विचारसरणीला बळी पडतात याचा मार्मिक शोध घेतो. हे आतडे पिळवटून टाकणारे कथानक असून इथे जीवंत राहण्यासाठी धडपड करायला लागणाऱ्या एका रात्रीमध्ये धैर्याला दहशतीचा अंतिम सामना करावा लागतो.

जसजशी ही कथा उलगडत जाते तसतसे प्रेक्षकही ‘फराज’च्या मनाची पकड घेणाऱ्या भावनिक प्रवासावर निघतात आणि गहन क्षण आणि हृदयस्पर्शी दृश्यांचा अनुभव घेतात, ज्यातून मानवी चैतन्य आणि श्रद्धेच्या शक्तीमधील चिवटपणा अधोरेखित होतो. हा चित्रपट दहशतवादाच्या अंधःकारामध्ये समर्पण करत नाही तर आशेच्या मार्गामध्ये प्रकाश आणतो आणि प्रतिकूलतेमध्येही उभे राहून उजेड शोधण्यासाठी प्रेक्षकांना प्रेरणा देतो.

दूरदर्शी दिग्दर्शक हंसल मेहतांसह “फराज” हा त्या दुर्दैवी दिवसाची खोली उलगडण्याचा आणि त्याचा आयुष्यांवर काय प्रभाव पडला हे शोधण्याचा प्रयत्न करतो. पण हे करताना तो कुठल्याही भीती किंवा पूर्वग्रहाला बळी पडत नाही. ते म्हणाले, “त्या दिवसाबद्दल प्रेक्षकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यामुळे आयुष्यांवर काय परिणाम झाला हे त्यांना कळावे अशी माझी इच्छा आहे. “फराज”चा खोल अनुभव हा केवळ मनोरंजनाच्या कितीतरी पलीकडे आहे. हा एक लक्षवेधी चित्रपट असून तो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. ह्या चित्रपटाचे शक्तीशाली साऊंड डिजाईन आणि व्हिज्युअल कथाकथन हे अविस्मरणीय प्रवासाची निर्मिती करतात आणि त्याचा मोठा प्रभाव निर्माण होतो. 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता अॅन्डएक्सप्लोरएचडीवर आमच्यासोबत ह्या मूळ कथेची झलक पहा आणि धैर्य, चिवटपणा आणि अविचल मानवी चैतन्याच्या संकल्पनांना पडताळून पहा.”

“फराज”चा खोल अनुभव हा केवळ मनोरंजनाच्या कितीतरी पलीकडे आहे. हा एक लक्षवेधी चित्रपट असून तो मानवी चैतन्यामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. झहान कपूर म्हणाला, “13 एप्रिल रोजी अॅन्डएक्सप्लोरएचडीवर दाखवण्यात येणाऱ्या ‘फराज’ला प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया मिळते हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. एक ठराविक साचा मोडणाऱ्या चित्रपटासोबत ह्या उद्योगामध्ये पदार्पण करणे हा मी माझा सन्मानच समजतो. हा चित्रपट प्रेक्षकांना एक खरी कथा सांगतो. चित्रपटांचा वारसा लाभलेला परिवारातून मी असल्यामुळे मी नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे चित्रपटांसोबत जोडलेला आहे. मला सुरूवातीपासूनच माहिती होतं की ह्याच उद्योगामध्ये मला माझे स्थान प्रस्थापित करायचे आहे. ‘फराज’ हा खरोखरीच समाधानकारक प्रवास राहिलेला आहे. केवळ अंतिम परिणाम नव्हे तर कथांना जीवंत करण्यासाठी समर्पित लोकांसोबत काम करण्याची प्रक्रियासुद्धा महत्त्वाची आहे.”

परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल म्हणाला, “ ‘फराज’मध्ये भूमिका करणे हा माझ्यासाठी एक समृद्ध करणारा अनुभव आणि संधी होती. हंसल मेहता यांच्यासोबत काम करायला मिळाल्यामुळे मला क्रुरपणामध्ये माझ्या व्यक्तिरेखेचा शोध घेता आला आणि आमच्या ह्या प्रोफेशनचे सौंदर्य दर्शवता आले. हा प्रवास अतिशय फायदेकारक राहिलेला असून आमचा प्रभावी चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा यासाठी मी उत्सुक आहे.”

‘फराज’मध्ये चित्रित केलेले तणावपूर्ण होस्टेज नाट्‌य एका गंभीर रात्री उलगडते आणि त्यात सहभागी असलेल्यांची तत्पर गरज आणि शौर्य वाढवते.

13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता अॅन्डएक्सप्लोरएचडीवर आमच्यासोबर सामिल व्हा आणि पहा धैर्य, चिवटपणा आणि अविचल मानवी चैतन्याची न झुकणारी कथा, दहशतवादासमोर गुडघे न टेकता त्याहून उंच होण्याची गाथा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!