आज गुरुवार दि ५ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा श्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत खलील मुद्द्यांवर चर्चा करून काही निर्णय करण्यात आले

बदलापूर प्रतिनिधी:-संजय कदम

बदलापूर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण, बदलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बदलापूर या मार्गावर सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत महिला प्रवाश्यांसाठी वाढीव लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली, बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था वाढवण्या बाबत व विश्राम कक्ष उभारण्या बाबत तसेच प्लॅटफॉर्म क्र २ वर उर्वरित भागात शेड उभी करून प्रवाश्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा व मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या कल्याण कसारा व कल्याण कर्जत रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण व कल्याण कसारा मार्गावर नवीन गुरवली रेल्वे स्थानका बाबतीत पुन्हा एकदा सर्वे करून फिसीबिलिटी रिपोर्ट सादर करण्याचे तसेच खडवली व वांगणी येथे मान्यता मिळालेल्या रेल्वे ओवर ब्रिजचे काम लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री मा रावसाहेब दानवे पाटील यांनी दिले व कर्जत कसारा या नवीन रेल्वे लाईन च्या मागणी संदर्भात लवकरात लवकर सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. मा. आमदार श्री.किसन कथोरे यांनी कल्याण कसारा व कल्याण कर्जत दरम्यान असलेल्या सर्व स्थानकांवर अद्यावत सुविधा तसेच सरकते जिने बसवण्या संदर्भात चर्चा केली व ३ नोव्हेंबर रोजी बदलापूर रेल्वे स्थानकाचा वाढदिवस असतो ,या कार्यक्रमासाठी व रेल्वे प्रवाश्यांना भेटून समस्या समजून घेण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे पाटील यांना
आमंत्रित केले आहे, त्याच प्रमाणे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री मा. श्री.कपिल पाटील साहेबांनी उर्वरित विषयांवर बैठक आयोजित करण्या संदर्भात सूचित केले.या बैठकीला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री मा.श्री. कपिल पाटील साहेब, मुरबाड विधानसभेचे आमदार मा.श्री. किसन कथोरे साहेब व भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा सोशल मीडिया व आयटी सेल संयोजक श्री.मिलिंद धारवाडकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!