जव्हार अर्बन बँकेत सर्व पक्षीय विरुद्ध जिजाऊ संघटना रिंगणात
जव्हार अर्बन – बँक पंचवार्षिक निवडणूक २०२२ या निवडणुकीचा आज नामनिर्देशन फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस .
आजच्या दिवशी पात्र ९५ उमेदवारांपैकी एकूण ६१ उमेदवारांनी माघार घेतली आहे .माघार घेतल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे .
आता निवडणुकीच्या मैदानात ३४ उमेदवार असून यात सर्वसाधारण वर्गात २४ , तर इतर मागास वर्गात २ तसेच महिला उमेदवार ४ अनुसूचित जाती जमाती मध्ये २ व विमुक्त जातीचे २ अशा प्रकारे १७ जागेसाठी ३४ उमेदवारांमध्ये थेट समोरासमोर लढत होणार आहे .
या निवडणुकीचे चित्र म्हणजेच निवडणुकीमध्ये खरी लढत सर्वपक्षीय विरुद्ध जिजाऊ संघटना यांच्यात होणार आहे .
दरम्यान आजच्या शेवटच्या दिवशी जहीर शेख , जमशेद खान , चित्रांगण घोलप , त्याचबरोबर इतर ६१ उमेदवारांनी माघार घेतली आहे .
तसेच निवडणुकीत अर्बन बँकेचे संचालक सचिन सटानेकर व जिल्हा परिषद पालघरचे उपाध्यक्ष शिवा सांबरे यांच्यात थेट लढत होणार आहे ,
तसेच अर्बन बँकेचे माजी चेअरमन संतोष चोथे व गणेश रजपूत यांच्यात थेट लढत होणार आहे .
त्याचबरोबर प्रसन्न भोईर व प्रवीण मुकणे यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे ,
तसेच भारतीय जनता पार्टी , राष्ट्रवादी , शिवसेना शिंदे गट , शिवसेना उद्धव गट , असे चार पक्ष एकत्र येऊन पॅनल तयार केला असून यांची थेट लढत जिजाऊ संघटनेशी असेल असे चित्र समोर दिसून येत आहे .
आता येणाऱ्या १४ तारखेला कोणता उमेदवार बाजी मारतो याकडे सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे ।…..
कोकण विभाग प्रमुख जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार ।……
आणखीन काही महत्त्वाचे
शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील
शेवगाव श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व कृषक भारती को ऑपरेटीव्ह लिमिटेड अहिल्यानगर यांचे...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
भाजप पक्षाचे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्या विरोधात जव्हार पोलीस स्टेशन येथे अर्जाद्वारे तक्रार दाखल..
जव्हार/प्रतिनिधी भाजप पक्षाचे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशन या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून पत्राद्वारे गुन्हा दाखल करण्याची...
सरपंचा विरोधात जव्हार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल !….
दी.३-५-२०२४ रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष व डेंगाची मेट ग्रामपंचायतचे सरपंच कमळाकर धूम यांच्यावर लैंगिक शोषण व...
जव्हार शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसैनी चिस्ती (र .अ .) शाही ऊरसाची आज पासून सुरवात …
दिनांक ५-१०-२०२३ गुरुवार पासून सुरुवात होणार आहे . दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक शाही उरूस रूढी परंपरे प्रमाणे यावर्षी देखील होणार आहे .......
आयटीआय विक्रमगडचा अजून विस्तार व्हावा – श्री. चैतन्य दिवेकर ‘स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सांगता’..
औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड जिल्हा पालघर येथे 17 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात...