शेवगाव येथील सोनामिया स्मशानभूमी व कब्रस्तान (मुस्लिम दफन भूमी) मधील विहीर दुरूस्ती व गाळ काढणे या कामाचा शुभारंभ..!

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
शेवगाव:शेवगांव येथील सामाजिक कामात अग्रेसर असणार्या *इन्सानियत फाऊंडेशन* च्या प्रयत्नातून तसेच *तूफेलभाई मुलानी* यांच्या *सुनेच्या स्मरणार्थ* सोनामिया स्मशानभूमी व कब्रस्तान या ठिकाणी असलेल्या जून्या व बंद विहीरीच्या दुरूस्ती, गाळ काढणे तसेच मोटर व पाईप लाईन टाकणे, विहीरीवर अच्छादन टाकणे इ.कामाचा शुभारंभ शेवगाव पंचायत समितिचे सभापती *डा. क्षितिज भैय्या घुले पाटिल* यांच्या हस्ते करण्यात आला. *इन्सानियत फाऊंडेशन* तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ईदगाह मैदान येथील सामाजिक कार्यकर्ते *श्री तूफेलभाई मुलानी* यांनी त्यांच्या सुनेच्या स्मरणार्थ या संपुर्ण कामाच्या खर्चाची जवाबदारी स्विकारली. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पंचायत समितिचे सभापती *डा.क्षितिज भैय्या घुले पाटिल* भुषविले.या कार्यक्रमास शेवगावचे मुख्य इमाम *मौलाना आबेद हाफीजसाहब, मौलाना मुख्तार हाफिज साहब, मौलाना गनी हाफीज साहब, हबीब मौलाना* व शेवगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी काम्रेड संजय नांगरे, वहाब भाई शेख, स्वाभिमानी शेतकरी संगठनेचे दत्तात्रय फुंदे,शब्दगंधचे सचिव विजय हुसळे सर,मौलाना आबेद हाफीजसाहब व डा.क्षितिज भैय्या घुले यांचे अध्यक्षीय भाषण झाले.अध्यक्षीय भाषणात बोलतांना डा. घुले म्हणाले, *इन्सानियत फाऊंडेशन* चे कार्य निस्वार्थ वृत्तीने प्रेरित आहे.हि संघटना सामाजिक कार्यात धर्म व राजकारण न आणता उदात्त मानवीय भावनेने काम करीत आहे, असे करित असतांना एक वेगळाच आनंद त्यांना मिळतो.जात धर्म महत्वाचे नसून माणुस महत्वाचा आहे. माणुसकी(इन्सानियत)महत्वाची आहे.*इन्सानियत फाउंडेशनने* स्मशानभूमी व कब्रस्तान परिसराचा चेहरा मोहरा बदलेला आहे.करोना काळात गरीबांना जेवन,रुग्णांची सेवा,गरजवंतांना किराणा सामान,पुरग्रस्तांना मदत या सारखी अनेक कार्य ते *लोकसहभागातून* करतात याचे आश्चर्य वाटते.या प्रसंगी तूफेल भाई यांनी कोणतेही राजकीय पद नसतांना *इन्सानियत फाऊंडेशन* च्या सांगण्यावरून व सुनेच्या स्मरणार्थ जी दानत दाखवली ती बाब निश्चित कौतुकास्पद आहे,असेही डा. घुले म्हणाले.
या प्रसंगी बोलतांना *मौलाना आबेद हाफीजसाहब* म्हणाले, नियत साफ़ ( स्वच्छ विचार)असेल तरच समाजोपयोगी कार्य घडत असतात.
या प्रसंगी इन्सनीयत फाउंडेशन चे सदस्य अस्लम शेख, फिरोज पटेल,आसिफ बेग,सादिक शेख, आलीम शेख, शैबाज काजी, शाहू फुले आंबेडकर कलाम चे अशोक शिंदे सर, राष्ट्रवादी कांग्रेसचे वहाब भाई,समीर भाई, कमलेश लांडगे, अप्पा मगर इ.चा इन्सानियत फाऊंडेशन कडून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन *इन्सनीयत फाउंडेशन चे अध्यक्ष श्री इस्माईल भाई शेख, सचिव रियाझ खान, खजिनदार इरफान पठाण* ह्यांनी केले व प्रास्ताविक *इन्सानियत फाऊंडेशनचे मुर्तजा शेख* यांनी केले,तर सुत्रसंचालन श्री कैलास जाधव सर यांनी केले.आभार *इन्सानियतचे शफिक पिंजारी* यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!